Public issue | पिंपळगाव माळवीत बिबट्याचा वाढता वावर? वनविभागाने लावला पिंजरा

उपसंपादक | दिपक शिरसाठ

नगर तालुका|रयत समाचार

(Public issue) गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरात बिबट्याच्या वावरात वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामपंचायत आणि वनविभागाला दिली.Public issue

(Public issue) ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत अखेर बुधवारी ता. १९ रोजी वनविभागाने गावालगतच्या एका बागेत बिबट्या जेरबंद करण्यासाठी मोठ्या आकाराचा पिंजरा बसवला. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड यांनी स्वखर्चाने नांदगाव येथून हा पिंजरा आणण्याची पुढाकार घेतला.

(Public issue) याकामी वनरक्षक श्रीहरी आठरे, तसेच प्रवीण भालके, शिवाजी गायकवाड, विराग गायकवाड, विजय खळेकर, रवींद्र गायकवाड, तुषार शिंदे, शुभम गायकवाड, महेश गायकवाड आणि सुशील गायकवाड यांनी मदत केली.

यावेळी वनविभागाने ग्रामस्थांना सावध राहण्याचे तसेच अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले. पिंजऱ्यात दररोज निरीक्षण करून बिबट्या पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article