Public issue | माळीवाडा वेशीवर संकट ! ऐतिहासिक ठेव्याच्या संरक्षणासाठी ‘इतिहासप्रेमी’ सक्रिय

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | १२.१२ | रयत समाचार

(Public issue) अहमदनगर शहराच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक असलेल्या माळीवाडा वेशीला पाडण्याचा बेकादेशिर प्रयत्न सुरू असून, यास नागरिकांचा तीव्र विरोध उमटू लागला आहे. शहरातील अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ आणि विविध इतिहास जाणिवेचे नागरिकांनी आज भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), अहमदनगर उपमंडळाच्या संवर्धन सहाय्यक एच.जे. दसरे यांना मागणीपत्र देत माळीवाडा वेशीचे संरक्षण तातडीने करावे, महानगरपालिका प्रशासक यशवंत डांगेंच्या या कृत्यास हरकत घ्यावी, अशी मागणी केली.Public issue

(Public issue) शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ऐतिहासिक अहमदनगर व गौरवशाली अहिल्यानगरच्या इतिहासाचा प्राण असलेली माळीवाडा वेस, जिच्या कुशीत महात्मा फुले यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या उभा आहे, त्या वेशीस पाडण्याचा प्रयत्न बाहेरगावाहून आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून होत आहे. त्यांना शहराच्या इतिहासाशी काहीही घेणेदेणे नाही.

(Public issue) अहिल्यानगर मनपा प्रशासक यशवंत डांगे यांनी पाडकामासंदर्भातील नोटीस ‘नवा मराठा’ दैनिकात प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.

इतिहासप्रेमी मंडळाने स्मरण करून दिले की, २०१८ मध्ये दिल्लीगेट वेस पाडण्याचे असेच षड्यंत्र रचले गेले होते; मात्र त्यास इतिहासप्रेमींसह एएसआयने तीव्र विरोध दर्शवून ती वेस वाचविली. त्याचप्रमाणे एएसआयने पुढाकार घेऊन आवश्यक झाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दाखवावी आणि माळीवाडा वेस पाडण्यापासून तात्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे.

याप्रकरणी अहिल्यानगर महानगरपालिकेवरही टीका करण्यात आली. “ज्या ऐतिहासिक कोट आणि वेशींच्या संरक्षणासाठी नगरपालिकेची स्थापना झाली, तीच महानगरपालिका आज त्यांच्या अस्तित्वावर घाला घालत आहे, हे खेदजनक आहे. माळीवाडा वेस पाडली गेल्यास यासाठी एएसआयच्या बेजबाबदारपणालाही जबाबदार धरले जाईल,”असा इशारा देण्यात आला आहे.

शिष्टमंडळात आसिफखान दुलेखान, भैरवनाथ वाकळे, इंजि. अभिजित वाघ, तुषार सोनवणे आदी सहभागी होते. मागणीपत्रावर ऋषीकेश आगरकर, शुभम झिंजे आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत. अहमदनगरच्या इतिहासाचा जिवंत पुरावा असलेली माळीवाडा वेस वाचवण्यासाठी नागरिकांची एकजूट वाढत असून, या प्रकरणी एएसआय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Public issue

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे इंजि. विनोद काकडे यांनीही याबाबत जनजागृती सुरू केली असून तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Public issue

दरम्यान, शहरातील नागरिकांनी माळीवाडा लवेशी सोबत सेल्फी काढून #savemaliwadaves #selfywithmaliwadaves मोहिम सुरू केली आहे.

Public issue

पालकमंत्री कार्यालय येथील भिंतीवरील माळीवाडा वेशीचे सुंदर चित्र

Share This Article