public issue | एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस व उद्योजकांची संयुक्त बैठक

आमी संघटनेचा पुढाकार

4 Min Read

अहमदनगर | ३० जानेवारी | प्रतिनिधी

(public issue) एमआयडीसी मधील विविध प्रश्‍न, गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होण्यासाठी आमीच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठजिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनीअनेक  प्रश्‍न उपस्थित केले.

  • सन फार्मा-निंबळक रस्ता काम पूर्ण करावे.
  • अहमदनगर औद्योगिक वाढीसाठी नवीन मोठे उद्योग (पॅरेंट कंपन्या) आणणे.
  • पंपिंग स्टेशन ते एमआयडीसी नवीन पाईप लाईन टाकणे.
  • ग्रामपंचायत टॅक्स हा एमआयडीसी कडे वर्ग असून , टॅक्स आकारणी कंपनीच्या बीबीसी प्रमाणे आकारण्यात यावी.
  • एम ब्लॉक मध्ये रस्त्यावरील कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी.
  • महावितरणचे नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात जागा मिळावी.
  • एल ब्लॉक येथे पोलीस चौकी उभारावी.
  • उद्योजकांनी एमआयडीसीत वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
  • नवीन जागा लावकारात लवकर उद्योजकांना वाटप करण्यात यावे.
  • महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी मांडला.
  • मिलिंद कुलकर्णी यांनी एमआयडीसीमधील समस्या व्यक्त केल्या तसेच गणेश कोलार यांनी औदयोगिक विकास वाढीसाठीच्या महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष वेधले.

(public issue) जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, एमआयडीसी मधील उद्योजक हा नगर शहराचा अर्थिक कणा आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो. नुकत्याच मुख्यमंत्री यांनी दावस येथे झालेल्या मिटिंगमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपये आणले आहेत. महिन्यातून एकदा झूम मीटिंग करून आपल्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यास मदत होईल. कंपन्यामध्ये वेगवेगळ्या अधिकारी चेकिंगसाठी येतात. त्यासाठी एक सिंगल विंडो सिस्टीम राबवू शकतो. एमआयडीसीचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्यांना सोबत जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.
तर आपल्या जवळील असणारे शहर पुढे निघून गेले आहेत. परंतु आपण हा विचार करत नाही की आपल्या मध्ये काय कमतरता आहे. ते शोधावे लागेल. त्याचप्रमाणे सरकार सर्व गोष्टी आपल्याला पुरवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. इंडस्ट्रीसाठी पोषक, भयमुक्त वातावरण तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण सांगितल्याप्रमाणे सन फार्मा ते सह्याद्री चौक या ठिकाणी भाजी मार्केट भरतो. तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अपघात होऊ शकतो लवकरात लवकर तो प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल या सर्व विषयावर विभागस्तरीय एक बैठक बोलवून प्रश्‍न सोडवण्यात येतील. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या तक्रारी सकारात्मक रित्या घेतल्या जातील, असे त्यांनी आश्‍वासन दिले.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यानी एमआयडीसी मधील चोरी, खंडणी, धमकी हा गंभीर प्रश्‍न आहे. सर्वात प्रथम उद्योजकांनी जो कोणी गुन्हेगार आहे, त्याच्या विरोध पोलीस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे. गुन्हेगार पकडण्यासाठी तक्रार करणे गरजेचे आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. कायद्याचा चाप कसा बसवायचा ते आमच्या वर सोडा. महाराष्ट्रात कायद्याच राज्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(public issue)रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांसाठी बॅरिकेटिंग करणे, टपऱ्यांचे अतिक्रमण हटवून अवैध धंद्यांवर कारवाई करणाचे त्यांनी आश्‍वासन दिले. तर रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविण्याचे स्पष्ट केले. तर कंपनीच्या कॅम्पसमध्ये व बाहेरील बाजूस सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत जेणे करून अजून आपली सुरक्षा व गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले, प्रांत सुधीर पाटील, किशोर जाधव, शेरकर, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी,  सुमित लोढा, सतीश गवळी,  दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख , चैतन्य जोशी ,नागराज बडगिरी राजेश बन्सल आशिष कांबळे राऊत, सोमाणी , गुलशन बोरा,  रोहन गांधी, चंदवाणी, सुमित सोनवणे, बाळकृष्ण नरवाडे, संदीप कोद्रे, मिलिंद कुलकर्णी, आदी आमी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Contents
अहमदनगर | ३० जानेवारी | प्रतिनिधी(public issue) एमआयडीसी मधील विविध प्रश्‍न, गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होण्यासाठी आमीच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनीअनेक  प्रश्‍न उपस्थित केले.(public issue) जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, एमआयडीसी मधील उद्योजक हा नगर शहराचा अर्थिक कणा आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो. नुकत्याच मुख्यमंत्री यांनी दावस येथे झालेल्या मिटिंगमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपये आणले आहेत. महिन्यातून एकदा झूम मीटिंग करून आपल्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यास मदत होईल. कंपन्यामध्ये वेगवेगळ्या अधिकारी चेकिंगसाठी येतात. त्यासाठी एक सिंगल विंडो सिस्टीम राबवू शकतो. एमआयडीसीचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्यांना सोबत जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. तर आपल्या जवळील असणारे शहर पुढे निघून गेले आहेत. परंतु आपण हा विचार करत नाही की आपल्या मध्ये काय कमतरता आहे. ते शोधावे लागेल. त्याचप्रमाणे सरकार सर्व गोष्टी आपल्याला पुरवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. इंडस्ट्रीसाठी पोषक, भयमुक्त वातावरण तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण सांगितल्याप्रमाणे सन फार्मा ते सह्याद्री चौक या ठिकाणी भाजी मार्केट भरतो. तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अपघात होऊ शकतो लवकरात लवकर तो प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल या सर्व विषयावर विभागस्तरीय एक बैठक बोलवून प्रश्‍न सोडवण्यात येतील. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या तक्रारी सकारात्मक रित्या घेतल्या जातील, असे त्यांनी आश्‍वासन दिले.(public issue)रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांसाठी बॅरिकेटिंग करणे, टपऱ्यांचे अतिक्रमण हटवून अवैध धंद्यांवर कारवाई करणाचे त्यांनी आश्‍वासन दिले. तर रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविण्याचे स्पष्ट केले. तर कंपनीच्या कॅम्पसमध्ये व बाहेरील बाजूस सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत जेणे करून अजून आपली सुरक्षा व गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले, प्रांत सुधीर पाटील, किशोर जाधव, शेरकर, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी,  सुमित लोढा, सतीश गवळी,  दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख , चैतन्य जोशी ,नागराज बडगिरी राजेश बन्सल आशिष कांबळे राऊत, सोमाणी , गुलशन बोरा,  रोहन गांधी, चंदवाणी, सुमित सोनवणे, बाळकृष्ण नरवाडे, संदीप कोद्रे, मिलिंद कुलकर्णी, आदी आमी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *