अहमदनगर |१० नोव्हेंबर | प्रतिनिधी
Press महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव रयत समाचारचे निवासी संपादक श्रीकांत काकतीकर आणि कर्नाटकमधील ‘संयुक्त कर्नाटक’ दैनिकाच्या वरीष्ठ पत्रकार तथा महिला पत्रकार संघटनेच्या किर्तना कुमारी के. यांनी रयत समाचार कार्यालयास शुभेच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आग्रहाने सांगितले की, महिलांना पत्रकारीता क्षेत्रात मोठा वाव आहे. महिलांचा समाजाकडे पहाण्याचा वेगळा दृष्टीकोन असतो. त्यांना चांगल्या वाईटाची जाण लगेच होते म्हणून मुलींनी करिअर म्हणून या क्षेत्रात आले पाहिजे. त्यांनी आलेले अनेक अनुभव कथन केले.
यावेळी विधानसभा निवडणूक, राजकीय, सामाजिक घडामोडी व महिलांचे विविध प्रश्न याविषयी सविस्तर चर्चा झाली. सीएसआरडी आयएसडब्ल्यूआरच्या बीजेएमसी पत्रकारीता महाविद्यालयाचे विद्यार्थी मरयम सय्यद, एस्थर, जोस यांनी किर्तनाकुमारी के. यांच्या सोबत पत्रकारीता Press क्षेत्राविषयी चर्चा करून विविध माहिती घेतली, विशेषत: महिला पत्रकारांच्या करिअरविषयी माहिती घेतली. प्रा.डॉ.सुरेश पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसआरडी येथे सुरू असलेला पुणे विद्यापीठाचा बीजेएमसी कोर्स करीअर म्हणून उत्तम असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत दत्ता वडवणीकर, दिपक शिरसाठ, पंकज गुंदेचा व भैरवनाथ वाकळे आदींनी सहभाग घेतला.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर