मुंबई | २५.९ | रयत समाचार
(Press) इंडियन एक्सप्रेस माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित ‘इंडियाज बेस्ट बँक्स’ पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.
(Press) यावेळी अमित शाह म्हणाले, ज्या देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्र प्रगत झाले आहे, तोच देश जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. भारतालाही २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र व्हायचे असेल, तर सर्वच क्षेत्रांतील उद्योग बळकट करावे लागतील. त्यासाठी बँकांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
(Press) कार्यक्रमादरम्यान फायनान्शिअल एक्सप्रेसचे संपादक श्यामल मुजुमदार व कार्यकारी संपादक ऋतुराज यांनी केंद्रीय मंत्री शाह यांची विशेष मुलाखत घेतली.
