मुंबई | १५ फेब्रुवारी | गुरूदत्त वाकदेकर
(Press) सकाळ वृत्तपत्र समुहाच्या वतीने दिला जाणारा २०२५ चा ‘सकाळ सन्मान’ गज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांना ता.१४ रोजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना पांचाळे म्हणाले, सकाश सन्मान हा मराठी गझलचा बहुमान आहे. याबद्दल ‘सकाळ’ समूहाचे मनःपूर्वक आभार, शुक्रिया !
(Press) ते पुढे म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नसून मराठी गझलचे खलिफा सुरेश भट, माझे सर्व गझलकार, कुटुंबीय, यार – दोस्त आणि रसिकांनो तुमचा आहे. हा पुरस्कार गझल गायकीच्या माझ्या अर्धशतकी वाटचालीतील एक विसावा आहे. मंज़िल अजुन दूर आहे… कैसे तय होगी रहे उम्र सहारे के बगैर, तुम मुझे दूर से आवाज ही देते रहना !
हे ही वाचा : poem | तुझ्या दाराहून जाता…पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची MILESTONE कविता