Press | परखड ‘अभिव्यक्ती’चे निर्भीड शिलेदार रविंद्र पोखरकर यांना ‘मावळा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; 19 फेब्रुवारीला वितरण

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कोल्हापूर | १३.२ | रयत समाचार

(Press) शिवछत्रपतींच्या शौर्य, निष्ठा आणि त्यागाच्या प्रेरणादायी परंपरेतून विचारांना दिशा देणारे, समाजमन जागृत ठेवणारे आणि परखड अभिव्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात दीर्घकाळ सातत्यपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत रविंद्र पोखरकर यांना सन २०२६ चा मानाचा ‘मावळा जीवनगौरव पुरस्कार‘ जाहीर करण्यात आला आहे.

(Press) ‘अभिव्यक्ती‘ या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर स्पष्ट, तत्त्वनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडत जनजागृतीचे मोलाचे कार्य केले आहे. इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमान जपत समाजप्रबोधनाची अखंड ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने पार पाडले आहे.

(Press) त्यांच्या या उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी योगदानाची दखल घेत, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

हा गौरवसोहळा गुरुवारी ता.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

समाजप्रबोधनाच्या या प्रेरणादायी क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article