Press | ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना ‘बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा सोहळा 2 जुलै रोजी मुंबईत

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

मुंबई | २९ जून | प्रतिनिधी

(Press) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी ‘पत्रकारिता पुरस्कार’ वितरण सोहळा बुधवारी २ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

(Press) या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नरेन्द्र जाधव (ज्येष्ठ विचारवंत) असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम. देशमुख (मुख्य विश्वस्त, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई) हे राहणार आहेत.

 

(Press) बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार मधुकर भावे (ज्येष्ठ पत्रकार) यांना दिला जाणार असून यावेळी विशेष सन्मान ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांचा होणार आहे. त्याचबरोबर आचार्य अत्रे स्मृती संपादक पुरस्कार– महेश म्हात्रे. पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार– पांडुरंग पाटील. सावित्रीबाई फुले स्मृती पत्रकारिता पुरस्कार– श्रीमती सीमा मराठे. शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार- अभिजित करांडे. पत्रकार प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार– अमेय तिरोडकर. नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार– सर्वोत्तम गावरस्कर. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार- दिनेश केळुस्कर. स्वातंत्र्यसैनिक स्व. माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार- बाळासाहेब पाटील. स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार– श्रीमती शर्मिला कलगुटकर. संतोष पवार आदर्श प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार– भरत निगडे दिले जाणार आहेत.

 

कार्यक्रमाच्या आयोजनात मिलिंद आष्टिवकर, किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, प्रा. सुरेश नाईकवाडे, मन्सुरभाई शेख, अनिल वाघमारे, शोभा जयपूरकर, विशाल परदेशी, दीपक कैतके, राजा आदाटे, संजय मिस्कीन, विनायक सानप, दीपक पवार, पांडुरंग म्हस्के आदीची विशेष भूमिका आहे.
या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील पत्रकार, लेखक, संपादक आणि वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हे एक प्रेरणादायी आणि गौरवशाली सोहळा ठरणार आहे.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *