राहुरी | २७.३ | रयत समाचार
(Politics) येथील बुवासिंदबाबा तालमीत हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले असल्याची माहिती राहुरी मतदारसंघाचे भावी उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या घटनेनंतरही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
(Politics) अधिक माहिती देताना तनपुरे म्हणाले, ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालणारी होती. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही. मात्र, वर्ष उलटूनही तपास यंत्रणांना आरोपींचा माग काढता आलेला नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
(Politics) तपास यंत्रणांचे हे अपयश असून त्यामागे राज्य सरकारची निष्क्रियता देखील कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेत अजूनही न्याय मिळालेला नाही. नेमके कोणाला वाचवले जात आहे? तपास का थांबवला गेला? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारला जाब विचारला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ही जनतेची आणि स्वतःची ठाम भूमिका असल्याचेही तनपुरे यांनी स्पष्ट केले.

