Politics | रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; आरोपांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची घडामोड

सत्य बाहेर येईलच

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | २७.३ | रयत समाचार

(Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी राजकीय घडामोड घडली असून, रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

(Politics) राजीनामा देताना चाकणकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत, संबंधित खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी म्हटले की, पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आर्थिक व्यवहार किंवा कोणत्याही गैरकृत्यात माझा दुरान्वये संबंध नाही. तपासातून सत्य समोर येईलच.

(Politics) तसेच, माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, “खोटे, असत्य आणि कोणताही पुरावा नसताना होत असलेले आरोप अत्यंत वेदनादायक आहेत.”
चाकणकर यांनी पुढे सांगितले, या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, यासाठी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे मागणी केली होती.
दरम्यान, आज सकाळी सुनेत्रा पवार यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय परिणाम काय?
राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण. विरोधकांकडून टीकेची शक्यता. तपासाच्या निकालावर पुढील राजकारण ठरणार.

 

Share This Article