पाचोरा | २७ मे| गुरुदत्त वाकदेकर
(Politics) भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पाचोऱ्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवलेले प्रतिष्ठित नेते दिलीपभाऊ वाघ यांनी आज मंगळवारी ता. २७ मे रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना नव्याने कलाटणी दिली. महाराष्ट्रातील भाजप मुख्यालयात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभा सभापती राम शिंदे, रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री, आमदार मंगेशदादा चव्हाण, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
(Politics) दिलीपभाऊ वाघ यांच्या या प्रवेशाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले असून राजकीय चर्चांना आणि अपेक्षांना नवे वळण लाभले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करत भाजपला स्थानिक पातळीवर मोठे बळ दिले आहे.
(Politics) या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी देखील दिलीप वाघ यांच्या सोबत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला यात प्रामुख्याने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पाचोरा पं.स.माजी सदस्य विजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक तथा पाचोरा पं.स.चे माजी सभापती अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, भडगाव न.पा.माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामकांत भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील, पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष भागवत महालपुरे, पाचोरा न.पा.माजी उपनगराध्यक्ष वासुदेव महाजन, जळगाव जिल्हा मजुर संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, पाचोरा शेतकरी संघाचे संचालक शिवदास पाटील, पाचोरा शेतकरी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, खडकदेवळा सरपंच सुदाम वाघ, माजी नगरसेवक तथा शेतकरी संघाचे संचालक शरद पाटील, शेतकरी संघाचे संचालक प्रविण गुजर, मच्छिंद्र थोरात, शशी पाटील, माजी नगरसेवक अशोक मोरे, माजी पं.स.सदस्य ललित वाघ, बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्ष संजय राठोड, माजी नगरसेवक वाशिद बागवान, अंतुर्ली सरपंच वसंत पाटील, माजी नगरसेवक रणजित पाटील, सु.भा.पाटील प्राथ.विद्यामंदिरचे चेअरमन जगदीश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत नैनाव, माजी नगरसेवक प्रकाश चौधरी, अजय अहिरे, अॅड. अविनाश सुतार, भगवान मिस्तरी, विनोद पाटील, अमोल ठाकूर, सुनिल चौधरी, गिरीष राठोड, प्रशांत महाले, गणेश पाटील, मोहसीन टकारी, अॅड. ललित सुतार, सतिष देशमुख, हरीष पाटील, निलेश पाटील, तेजस पाटील, सचिन शिंदे, गौरव पाटील, चेतन पाटील, युक्तेश बाविस्कर, महेश माळी, कृष्णराव साळूंखे, शामकांत वाडेकर, दिपक पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र साळूंखे, दत्तात्रय पाटील, वसंत पाटील, राजेंद्र पाटील, मनोज वाघ, प्रदिप वाघ, सदाशिव नरवाडे, युनूस मेंबर, संदीप कोल्हे, महेंद्र मानसिंग पाटील, रंगराव पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, सुरेश कोळी, आबा पाटील, वाल्मिक पाटील, सचिन पाटील, विलास पाटील, अरूण पाटील, मनोजकुमार पाटील, प्रा. डॉ. माणिक पाटील, धर्मराज पाटील, संजय राठोड, गुलाब पाटील, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, डिगंबर बोरसे, प्रशांत पाटील, सुरेश परदेशी, सचिन शिंदे, लोकेश पाटील, भुपेंद्र पाटील, कपुरचंद तेली, अनिल देवरे, मोजुलाल जैन, दिलीप जैन, संतोष कुटे, प्रशांत माळी, पंडीत नैनाव, गोविंदा येवले, प्रशांत नैनाव, रविंद्र पाटील, अमोल पाटील, हर्षल पाटील, रामेश्वर पवार, विनोद पाटील, संजय पाटील, चेतन परदेशी, नंदू टिळक, किशोर पाटील, रशीद काहकर, शितल पाटील, रामभाऊ पाटील, हिरालाल पाटील, बी.एम.पाटील, किरण देवरे, भिमा पाटील, अविनाश पाटील, कर्नल पाटील, विजय राठोड, सचिन राठोड, भास्कर व्यवहारे, सुपडू परदेशी, कैलास पाटील, शेखर राजपूत, रघुनाथ पाटील, रावसाहेब पाटील, शंतनु पाटील, सागर अहिरे, रामधन परदेशी, नितेश शेलार, विलास भामरे, अशोक सोनी, अभिजीत पवार, रज्जाक अबिद, मुन्नाकाका परदेशी, पिंटू तावरे, कमल पाटील, सागर पाटील, चंदन झंवर, बापु सोमवंशी, सचिन पाटील, भुषण पाटील, सुनिल पाटील, रमेश पाटील, बालाजी पाटील, कल्याण पाटील, कुणाल पाटील, मोनू हिरे, पुरूषोत्तम पाटील, लक्ष्मण पाटील, विश्वनाथ पाटील, विनोद पाटील, भिमराव पाटील, कल्पेश पाटील, संजय कारभारी, भाईदास पाटील, रणधीर पाटील, अशोक पाटील, अरूण सोनवणे, यशवंत पाटील, परेश पाटील, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, भुषण पाटील, संजय पाटील, विकी पाटील, निखिल पाटील, सोनु पाटील, हिराजी पाटील, शिवराज पाटील, ताराचंद पाटील, जितेंद्र पाटील, किरण पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील, झिपरू केदार यांसारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला.
या सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो एक व्यापक जनसहभाग होता जो भाजपच्या नेतृत्वाखाली स्थानिक विकासाच्या दिशेने नव्या ध्येयाने पुढे जाणार असल्याचे संकेत देतो.
