(Politics) अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्ह्यातून एक मोठी कारवाई समोर आली आहे. पक्षाचे सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे यांनी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सुशील राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
(Politics) ता. २१ मे २०२५ रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली असून, हगवणे यांची हकालपट्टी तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. या निर्णयाबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष पुणे ग्रामीण यांना कळवण्यात आले असून, सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीही हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र अधिकृत कारण पत्रात जाहीर करण्यात आलेले नाही.
(Politics) या कारवाईनंतर स्थानिक राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. हगवणे यांची राजकीय भूमिका काय असेल, व ते पुढे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.