अहमदनगर | १ मे | प्रतिनिधी
(Politics) भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलाच्या अध्यक्षपदी सीए राजेंद्र काळे यांची निवड झाल्याबद्दल शहर भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर व ज्येष्ठ नेते ॲड. अच्युतराव पिंगळे यांच्या हस्ते सीए काळे यांचा सत्कार करण्यात आला.
(Politics) यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, मयुर बोचुघोळ, अर्बन बँकेचे माजी संचालक भैय्या गंधे, नरेंद्र कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षा प्रियाताई जानवे, सरचिटणीस सचिन पारखी, महेश नामदे, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, तुषार पोटे, कैलास गर्जे, आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी,
सावेडी प्रभागातील गतवर्षीचे नगरसेवक बारस्कर, वाकळे, कराळे, ताठे यांची विद्यमान आमदारांशी लगट व पक्ष कार्यक्रमास मारलेली दांडी पहाता कार्यकर्त्यांमधे उलटसुलट चर्चा सुरू होती.
(Politics) सरगमप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे, अर्बन बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी, दीनदयाळ परिवाराचे धनंजय तागडे, माजी नगरसेविका संगीताताई खरमाळे, मनिषा बारस्कर- काळे, जगन्नाथ आंधळे, मनोज दुल्लम उपस्थित होते.
तसेच संजय ढोणे, सतीश शिंदे, संपत नलवडे, सीए शाखेचे अध्यक्ष प्रसाद पुराणिक, अभाविपचे प्रा. राजेंद्र काळे, प्रा.मिलिंद देशपांडे, अजिंक्य गुरावे, हिंदुराष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, माजी बीडीओ नितीन उदमले तसेच यावेळी सीए सभासद, डॉक्टर्स, वकील मंडळी, पक्षाचे सावेडीतील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी छत्रपती राजर्षी शाहु विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि काळे यांचे महाविद्यालयीन मित्रपरिवार उपस्थित होते.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
Contents