अहमदनगर | २६.३ | रयत समाचार
अहिल्यानगर ऑटो रिक्षा टॅक्सी चालकमालक संघटनेच्या वतीने स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त अरुणोदय गोशाळा व पार्वतीबाई सुखदेव वेताळ गोशाळेत गायींसाठी चाऱ्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत चारावाटप करण्यात आला.
यावेळी अजय चितळे, चंदूभाऊ औषिकर, गणेश औटी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संघटनेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, सचिव अशोक औषिकर, भगवान काटे, संजय शहाणे, आशिष दांगडे, सुनील ढोणे, वेताळ मेजर, अविनाश वानखेडे, अभिषेक साठे, सतीश कांबळे, अजय साठे, राजेंद्र विधाते, बंटी गायकवाड, भीमा घोडके, रामदास सुतार, दिलीप गायकवाड, अनंता औषिकर, मनीष फुलडहाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांनी स्व. अरुणकाका जगताप यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या सामाजिक योगदानाला अभिवादन केले. संघटनेच्या वतीने अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न कायम राहील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला. उपक्रमाबद्दल गोशाळेच्या वतीने आभार मानले.

