शेवगाव | १६ जुलै | प्रतिनिधी
(Politics) शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी राष्ट्रवादी-शिवसेना महिला नेत्या विद्या भाऊसाहेब गाडेकर यांनी आपल्या विरोधकांवर राजकीय द्वेषातून पोलिसांशी संगनमत करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याविषयी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
(Politics) गाडेकर यांनी सांगितले की, “माझ्यावर ४२० व तत्सम कलमांतर्गत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या खोट्या गुन्ह्यांचा उद्देश माझी बदनामी करणे आणि राजकीय कारकीर्द संपवण्याचा आहे. मी ज्या समाजासाठी कार्य करते, त्या समाजात माझी प्रतिमा मलीन करावी म्हणून पोलीस निरीक्षकांनी काही राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून कारवाई केली.”
(Politics) त्यांनी सांगितले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रदेश सचिव, विधानसभा निरीक्षक, ओबीसी निरीक्षक अशी पदे भूषवली. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय विरोधक चिडले असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून खोट्या तक्रारी दिल्या.
“कोणतीही चौकशी किंवा विचार न करता केवळ दबावाखाली हे गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र, मी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे,” असे त्या म्हणाल्या.
तसेच, जर ८ दिवसांत या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन पोलिसांवर व राजकीय दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर पोलीस महासंचालक नाशिक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
“मी महिला असूनही मला खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले. माझ्यावर मानसिक छळ सुरू आहे. पण मी अहिल्याबाई होळकरांच्या जिल्ह्यातली असून, कामातूनच विरोधकांना उत्तर देणार.”
– विद्या भाऊसाहेब गाडेकर
