अहमदनगर | २ जुलै | प्रतिनिधी
(Politics) नगर शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये वितरित केली जाणारी पोषक पावडर ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, पालकांनी ती आपल्या पाल्यांना देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पावडरचा दर्जा कमी असल्याने ती अंगणवाड्यांमधून घरी नेली जात नसून थेट कचऱ्याच्या डब्यात फेकली जात असल्याचे दिसून येते. यामुळे शासनाच्या पोषण आहार योजनेचा मूळ उद्देशच फोल ठरत असल्याची खंत शिवसेनेचे आनंद राठोड व गौरव ढोणे यांनी व्यक्त केली.
(Politics) या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेना व कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे की, पूर्वीप्रमाणे गहू, तांदूळ, साखर, चणा, हळद, मीठ, मिरची या स्वरूपातील साहित्यच अंगणवाड्यांमधून वाटप करण्यात यावे.
(Politics) यासंदर्भात युवासेना युवा अधिकारी आनंद भैय्या राठोड यांनी सांगितले की, सध्याचे पावडर स्वरूपातील अन्न न खाण्यायोग्य असून यामुळे बालकांच्या पोषणावर प्रतिकूल परिणाम होतो आहे. याऐवजी पुन्हा एकदा पारंपरिक स्वरूपातील सुकामालाच वितरित करावा.
कामगार सेना शहर प्रमुख गौरव भैय्या ढोणे यांनीही या मागणीला दुजोरा दिला असून सांगितले की, सरकारने नागरिकांचा, विशेषतः बालकांचा विचार करून लोकहिताचा निर्णय घ्यावा.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ही बाब शासन दरबारी मांडण्यात आली असून, लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी पालकांनी आनंद राठोड 9960155869 व गौरव ढोणे 9822522226 यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
