श्रीरामपूर | २५ सप्टेंबर | प्रतिनिधी
Politics जिल्हाभरात मनविसेचे काम जोरदारपणे सुरू असून राहुरी, श्रीरामपूर यांनी आघाडी घेतलेली दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीरामपूर मनविसे तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच औदुंबर खरात यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.संजय नवरात, जिल्हा सचिव विलास पाटणी, तालुकाध्यक्ष अतुल खरात, उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार, पुनमताई जाधव, शितलताई गोरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थितीत होते.
आपल्या मनोगतात औदुंबर खरात म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर व अमित ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, आदेशाचे पालन करत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू. कोणत्याही संकटात विद्यार्थ्यांना मनविसेची आठवण झाली पाहिजे असे कार्य करू.
औदुंबर खरात यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना अनेकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.