Politics | 200 कोटींच्या ‘गुलाबी जॅकेट’साठी ‘महाज्योती’चा निधी पळवला? – लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | ९ जून | प्रतिनिधी

(Politics) महाज्योतीसारख्या शिक्षणविषयक संस्थांचा निधी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी वापरला जावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र, या निधीचा वापर पीआर फर्मसाठी केला जातोय, असा गंभीर आरोप ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.

 

(Politics) हाके यांनी म्हटले, महाज्योतीच्या माध्यमातून मिळणारा पीएचडी फेलोशिप निधी वेळेवर विद्यार्थ्यांना दिला जात नाही. वसतीगृहे अर्धवट आहेत. यामागे सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी ‘डिजाईन बॉक्स’ नावाच्या एका पीआर कंपनीकडे वळवण्यात आला आहे.

 

(Politics) त्यांनी आरोप केला की, हीच डिजाईन बॉक्स कंपनी सोशल मिडीयावर ओबीसी नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचते. ‘Maha Meme’ आणि ‘Marathi Troll’ सारखी पेजेस या कंपनीच्या माध्यमातून चालवली जातात. हे पेजेस ओबीसी चळवळीचे नेते, हाके, पडळकर, भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करतात.

 

हाके पुढे म्हणाले, अजित पवारांना यामधून केवळ एक ‘गुलाबी जॅकेट’ मिळालं. पण इमेज बिल्डिंग करूनसुद्धा ओबीसी जनतेने लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला. बारामतीमध्येही पराभव पत्करावा लागला. महायुतीला ओबीसी समाजाने मतदान केलं, हे विसरू नका, असा इशारा देत हाके यांनी मागणी केली की, ओबीसींसाठी समान निधी वितरित करून उपकारांची परतफेड करा.

Politics

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *