मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

Politics | 19 सप्टेंबरला पेमराज सारडा महाविद्यालयात नमो वक्तृत्व स्पर्धा; भाजपा सावेडी मंडलाचा पुढाकार; विद्यार्थ्यांमध्ये वाढणार आत्मविश्वास व वक्तृत्व कौशल्य

Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर | रयत समाचार 

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नमो वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारांची मांडणी व प्रभावी संवाद कौशल्य विकसित व्हावे हा उद्देश आहे, अशी माहिती भाजपा सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी दिली.

 

या स्पर्धेत ११वी पासून पुढे कोणताही विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. स्पर्धेसाठी किमान ५ ते कमाल ७ मिनिटांचा वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुढील पैकी कोणत्याही एका विषयावर भाषण करता येईल – १) सध्याच्या जागतिक अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सक्षम नेतृत्वाचे महत्त्व. २) जागतिक व्यापारी युद्धात (टेरिफ) मोदींच्या परराष्ट्रीय कूटनितीचे महत्व. ३) मोदींच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सिंदुरचे भविष्यकालीन सामरिक महत्व. ४) स्वदेशीचा नारा देत मोदींच्या स्वप्नातील समर्थ भारत

 

विचारांची मांडणी, भाषाशैली व शब्दप्रयोग, आत्मविश्वास, देहबोली व वेळेचे नियोजन या निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार असून सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

ही स्पर्धा पेमराज सारडा महाविद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात उद्या ता. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी प्रा. अविनाश झरेकर यांच्याशी ८२०८२६७८७३ किंवा ९४२०६३४४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now