मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

police:किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

Follow Us:
---Advertisement---
70 / 100 SEO Score

गंगाखेड | प्रतिनिधी

तालुक्यातील पोकर्णी (वाळके) येथील अल्पभूधारक सुमनबाई आणि महादेव करे या कष्टाळू शेतकरी दांपत्याचा मुलगा मनोज करे यांची महाराष्ट्र police दलात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. मनोज करे यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

पोकर्णी (वाळके) येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्य सुमनबाई आणि महादेव करे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मनोज यांना शिक्षण दिले. शेतीच्या उत्पन्नात शिक्षण देणे खूप जिकिरीचे होते. परंतु महादेव आणि सुमनबाई यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. मनोज यांनीही अत्यंत तुटपुंज्या साधन सामग्रीमध्ये जिद्दीने अभ्यास केला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे. ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे मनोज हे भाचे आहेत.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Leave a Comment