शेवगाव | २७ ऑगस्ट | सचिन खेडकर
‘ओळखलत का सर मला?’ Ngo
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको पोर मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
वरील ओळी आठवण्याचे कारण,
गेल्या पाच दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाने वाड्याच्या जीर्ण झालेल्या भिंतीत खूप मोठ्या प्रमाणावर पाणी मुरले. त्यामुळे दगडमातीची असलेली भिंत फुगली आणि रात्री ११;३० वाजता खूप मोठा धडाधड आवाज करत भिंत कोसळली. आवाजाने मुले घाबरून खडबडून जागी झाली. भिंत पडल्याचा आवाज आणि मुलांचा गोंधळ ऐकून गल्लीतील सर्व नागरिक धावतच वाड्यात आले. “सचिन सर… मुलांना काही झाले का…तुम्हाला काही लागले का… कोणती भिंत पडली.… सर्व सुरक्षित आहेत का”…? अशी चौकशी करू लागले. तसेच काहींच्या फोनवरून सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना सुरू झाल्या. यातून पुन्हा एकदा शेवगावकरांचे उचल फाउंडेशनवरील प्रेम आणि काळजी दिसून आली.
मुलांची निवासाची जागा आधीच पक्की करून घेतल्याने इकडे काही हानी झाली नाही. पण पडझड झालेल्या ठिकाणी धुणी-भांडी करण्याची जागा होती. रात्री घटना घडल्याने तिकडे कुणी नव्हतं, एवढेच काय ते समाधान. खरंतर इकडचे दुरुस्तीचे काम सुरूच करायचे होते पण सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळेच हे काम लांबणीवर पडले होते. त्यात आता ही पडझड झाल्याने काम वाढून बसले आहे.
आता आज सकाळपासून कवी कुसुमाग्रज यांच्या वारील कवितेचा अनुभव घेत इथले दगड-माती, झाडे-झुडपे आणि झालेला राडा-रोडा काढत आहोत.
इथे या कवितेचा शेवटही खूप समर्पक वाटतो.
कवितेच्या शेवटी कुसुमाग्रज म्हणतात, कारभारणीला घेऊन संगे,
पण मी म्हणेल की तिच्यासह…
सर्व लेकरांनाही घेऊन संगे…
पडकी भिंत बांधतो आहे,
चिखल गाळ काढतो आहे.
खिश्याकडे हात जाताच,
हसत हसत उठला,
“पैसे नकोत सर…
जरा एकटे पणा वाटला,”
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा..!!
अगदी असेच तुम्हीही आम्हाला, फक्त लढ म्हणा..!!
– सचिन खेडकर, शेवगाव
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.