मुंबई | ५ मार्च | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष नंदकुमार काटकर यांची पुन्हा एकदा मुंबई सहकार सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात नव्या ऊर्जा आणि नेतृत्वाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(Mumbai news) सहकार क्षेत्रात काटकर यांचे योगदान : नंदकुमार काटकर यांनी सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांची कार्यशैली, संघटन कौशल्य आणि सहकार क्षेत्रातील अनुभव यामुळे त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्था अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा आहे.
(Mumbai news) अखिल भारतीय मराठा महासंघ, मुंबई शहर सरचिटणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासन उपाध्यक्ष महेंद्र मंदाकिनी जगन्नाथ तावडे यांनी सहकारी संस्था आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मुंबई सहकार सेलच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर नंदकुमार काटकर यांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आपले संकल्प स्पष्ट केले आहेत. सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था, पतपेढ्या आणि अन्य सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी ते कार्यरत राहतील. तसेच, सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.
त्यांच्या या निवडीबद्दल सहकार क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.