mumbai news: सुधागड विद्या संकुल, कळंबोलीत दादासाहेब लिमये जयंतीनिमित्त झाला होता 41 हजार दिव्यांचा दीपोत्सव; दादासाहेब लिमयेंच्या ज्ञानप्रकाशाने उजळली माणसे !

उपसंपादक | दिपक शिरसाठ

शिक्षणवार्ता

रायगड | १२ जानेवारी | सोपान अडसरे

(mumbai news) ता. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त सुधागड विद्या संकुल, कळंबोली या शैक्षणिक संकुलामधे ४१ हजार मातीचे दिवे प्रकाशमान करून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. या कल्पनेसाठी विद्यालयातील प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी यांनी एकजुटीने, एक मनाने फक्त दहा मिनिटांमध्ये ४१ हजार दिव्यांची वात पेटवली आणि दीपोत्सवाचे विलोभनीय दृश्य कळंबोलीकरांना पहाण्यास मिळाले. खरोखरच या पर्वणीचा आनंद संपूर्ण कळंबोलीवासीयांनी घेतला, डोळ्यांचे पारणे फिटले.

mumbai news
दादासाहेब लिमये जयंतीनिमित्त दीपोत्सव संपन्न

 

mumbai news  (mumbai news)  सुधागड तालुक्यातील पाली येथे आदिवासी भागामध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणारे, कुलाबा जिल्ह्याचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष तथा दलितमित्र कै. केशव गोविंद लिमये उर्फ दादासाहेब लिमये यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोरगरीब, आदिवासी, मजूर वर्गातील मुलेमुली शिकावित व समाजात टिकाव धरावा, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, या हेतूने सु.ए.सो.ची स्थापना केली. आज जवळ जवळ ३७ शाखा विद्यादानाचे कार्य करित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुधागड विद्या संकुल, कळंबोली.

mumbai news
दलितमित्र कै.केशव गोविंद लिमये उर्फ दादासाहेब लिमये

या संकुलामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशी चार माध्यमे. दोन सुसज्ज व भौतिक सुविधापूर्ण इमारती आहेत. जे छोटेसे रोपटे दादासाहेबांनी पालीसारख्या ग्रामीण भागात लावले ते आज कळंबोलीपर्यंत मोठ्या वृक्षाच्या रूपात बहरलेले दिसून येत आहे. या विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे अत्यंत चिकाटीने शैक्षणिक वृक्षाची देखभाल करत आहेत. मध्यमवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना योग्य, चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने प्राचार्य पालवे अहोरात्र मेहनत घेतात. त्यांच्या या मेहनतीमुळे आज जवळपास १२ हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत.
 येथे शिकलेले अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी उच्चपदावर काम करत आहेत. काही विदेशामध्येही उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून समाजात गेल्यानंतर तो कुठेही मागे नसावा प्रत्येक क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, यासाठी या विद्या संकुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे, विविध उपक्रम आयोजित केले जातात. जेणेकरून आपला विद्यार्थी हा परिपक्व झाला पाहिजे. या हेतूने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा या संकुलात आयोजित केल्या जातात. शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या विद्यार्थी तंदुरुस्त असावा, यासाठी सुसज्ज मैदान व तज्ञशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे क्रीडा प्रकार व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांमध्ये असणारे विविध कलागुण ओळखूण त्यांना वाव देण्यासाठी त्यांच्यात असणार कौशल्य बाहेर घेण्यासाठी व त्याला आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कुठेतरी वापर व्हावा, यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या संकुलामध्ये घेतले जातात.
विद्यार्थी हा बहुगुणी असावा, या दृष्टीने जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये असणारे सुप्त गुण बाहेर येण्यासाठी कला, क्रीडा, संगीत, नाटक, गायन या सर्व गोष्टी तज्ञशिक्षकांच्या माध्यमातून शिकविल्या जातात, राबवल्या जातात. त्याचबरोबर आपण समाजाचे देखील काहीतरी देणेकरी घटक आहोत. या माध्यमातून समाज प्रबोधन व समाजामध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य देखील सुधागड विद्यासंकुल करत आहे.
‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांमध्ये तब्बल साडेसात हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळेस रॅली काढून अमृत महोत्सव देखील साजरा केला. किमान २.५ किलोमीटर विद्यार्थ्यांनी एक रांग करून महोत्सव रॅली पूर्ण कळंबोली शहरांमध्ये करून दाखवली. एवढेच नव्हे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये देखील कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे संकुल आज पालकांमधे प्रसिद्ध आहे.

माहितीपट पहा : दलितमित्र कै. केशव गोविंद लिमये उर्फ दादासाहेब लिमये (सौजन्य – वसंत लिमये)

या सर्व गोष्टींचे श्रेय प्राचार्य पालवे यांना जाते. त्यांची आत्मियता, शाळेविषयी असलेले प्रेम आणि विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ‘माझा विद्यार्थी हा परिपक्वच झाला पाहिजे’ ज्याप्रमाणे दादासाहेबांनी सांगितले की, ‘या शिका, मोठे व्हा’, ‘कृती पाहिजे बडबड नको’ त्याप्रमाणे प्राचार्य पालवे यांनी हे करून दाखवले.

Read This: History: The Indians: A Useful Reference Book for Scholars of South Asian History

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *