मुंबई | ३ एप्रिल | प्रतिनिधी
(Mumbai news) बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळविलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटीद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महानगरपालिकेमार्फत जुलै महिन्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
(Mumbai news) याबाबत विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी आमदार योगेश सागर, सुनील शिंदे तर ॲड.अनिल परब, सचिन अहिर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
(Mumbai news) आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, अशी ४५७ बांधकामे असून त्यापैकी ६६ प्रकरणी कारवाई करण्यात आली असून इतरांना नोटीस देण्यात येईल. एसआयटीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशीनुसार २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : Alert news | स्पॅम कॉल आल्यास काय करावे?
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.