अहमदनगर | प्रतिनिधी
येथील कौटुंबिक व कामगार न्यायालयात झालेल्या lok adalat रोजी अनेक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. आजच्या लोकन्यायालयाचे उद्घाटन न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुतळ्यास न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश मनिषा द. चराटे-हंपे, न्यायाधीश बी.एस. लखोटे, अभिजीत देशमुख, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड.सुरेश लगड, सचिव ॲड.राजेश कावरे, प्रभारी प्रबंधक सुधीर काकडे, धीरज नारखेडे, शेखर मेहेत्रे, अविनाश सूर्यवंशी, रंगनाथ गवळी, गजानन देशमुख, मुकरम शेख, कविता बारेला, अशोक राहिंज, संतोष अळकुटे, पो.कॉ.भगत मॅडम, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक पाटील, ॲड.कल्याण पागर, ॲड.मनीषा केळगंद्रे, ॲड.अशोक गुंड, ॲड.दिपक चंगेडे, ॲड बी.आर. शेलार, ॲड.जयेश आमले, एस.बी. राऊत, ए.पी. झिंजे आदी उपस्थित होते.
दैनंदिन न्यायालयासमोर वाढती प्रकरणे व एवढ्या मोठ्या प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी लोकन्यायालय काळाची गरज बनली आहे. येथे समोपचाराने प्रकरणे निकाली काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना न्यायाधीश भालेराव यांनी व्यक्त केली.
लोकन्यायालयात औद्योगिक न्यायालयातील २७ पैकी २६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे देखील समोपचाराने सोडविण्यात आली.
हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.