Literature | दिवाळी अंकातील लेखांचा ‘उच्चांक’! टी.एन. परदेशी यांचे ‘पिंपळपान’ अमृतमहोत्सवी सोहळ्यात प्रकाशित

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १७.२ | रयत समाचार

(Literature) नाथधर्माचे अभ्यासक, प्रसिद्ध साहित्यिक टी.एन. परदेशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या ‘पिंपळपान’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले, अशी माहिती परदेशी यांनी दिली. ‘पिंपळपान’ हे परदेशी यांचे दहावे पुस्तक असून पुण्यातील ‘शुभम साहित्य’ने त्याचे प्रकाशन केले आहे.

अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकात १९९३ ते २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दहा लेखांचे या पुस्तकात संकलन करण्यात आले आहे.

(Literature) सत्तरहून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांवर आधारित ‘निवडक ऋतुरंग’ व ‘ऐवज’ या बृहत ग्रंथांनंतर हे एकूण ९७ वे पुस्तक ठरले आहे. विशेष म्हणजे आणखी तीन पुस्तके प्रकाशनाच्या प्रक्रियेत असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

(Literature) एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांवर आधारित तब्बल शंभराच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही पुस्तकांची मालिका हा मराठी साहित्यविश्वातील एक उल्लेखनीय उच्चांक मानला जात आहे.

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Share This Article