(latest news) यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. यासोबतच राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मावळते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्याने येथील जागा रिकामी होती.
(latest news) नवीन सरकारचा राज्यातल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. आज पुन्हा आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये एमएमआरडीएचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांची मीर भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
बदली झालेले आयएएस अधिकारी
१. राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती
२. एम.जे. प्रदीप चंद्रेन यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती
३. बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले .
४. जगदीश मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली .
५. गोपीचंद कदम यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली .
६. वैदेही रानडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली .
७. डॉ. अर्जुन चिखले यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली .
८. डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती