Latest news | छगन भुजबळ आज घेणार मंत्रीपदाची शपथ; धनंजय मुंडे यांच्या जागी ‘चंचूप्रवेश’

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Breaking news

मुंबई | २० मे | गुरूदत्त वाकदेकर

(Latest news) महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळी महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आज सकाळी १० वाजता राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे.

(Latest news) राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा भुजबळ यांचा समावेश होत आहे. अनुभवी आणि प्रशासनात गाढा अनुभव असलेले भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपविण्यात येत असल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.Latest news

(Latest news) सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये हालचाली वेग घेत आहेत. अशा वेळी भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *