Kolhapur News: शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

69 / 100 SEO Score

कोल्हापूर | २८ ऑक्टोबर | प्रतिनिधी

Kolhapur News शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटी या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थेकडून सन २०२४ साठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

इंडियन केमिकल सोसायटी ही भारतातील रसायनशास्त्रज्ञांची मातृसंस्था असून यंदा शतकमहोत्सव साजरा करीत आहे. संस्थेच्या या शतकमहोत्सवी वर्षातील जीवनगौरव पुरस्कार डॉ. साळुंखे यांना जाहीर झाला. येत्या १९ ते २१ डिसेंबर २०२४ रोजी जयपूर येथे संस्थेचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले.

डॉ. साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारासह संस्थेची ‘मानद आजीव फेलोशीप’ही त्यांना प्रदान करण्यात येणार.

डॉ. साळुंखे यांनी जयपूर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, इंदूर आणि भारती विद्यापीठ, पुणे या विद्यापीठांचेही कुलगुरूपद भूषविले आहे.
डॉ. साळुंखे यांनी रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकीसह संबंधित उद्योगांमध्ये आपल्या संशोधनाच्या माध्यमातून मौलिक योगदान देऊन आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि कर्तव्यकठोर शैक्षणिक प्रशासक म्हणूनही राष्ट्रीयस्तरावर डॉ. साळुंखे यांनी लौकिक प्रस्थापित केलेला आहे.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *