Ipl | सुदर्शनच्या शानदार खेळीमुळे गुजरातने मारले विजयी चौकार; राजस्थानचा ‘विजय रथ’ थांबला

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

मुंबई | १० एप्रिल | गुरुदत्त वाकदेकर

(Ipl) आयपीएल २०२५ च्या २३ व्या सामन्यात सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार खेळीमुळे गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. या विजयासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने चौथा विजय मिळवला आहे. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणारा राजस्थान रॉयल्स विजयी मार्गावरून दूर गेला.

(Ipl) राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, खराब सुरुवातीनंतर, राजस्थान रॉयल्स फक्त १५९ धावा करू शकले.

(Ipl) प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात खराब झाली आणि कर्णधार गिलला फक्त २ धावा करता आल्या. यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी ४७ चेंडूत ८० धावा जोडल्या. दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर महेश थीकशनाने बटलरला पायचीत टिपले. त्याने २५ चेंडूत ५ चौकारांसह ३६ धावांची खेळी केली.
बटलर गेल्यानंतर साईने शाहरुखसोबत भागीदारी केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी देखील तीक्षनानेच मोडली. १६ व्या षटकात त्याने शाहरुखला यष्टीचीत केले. शाहरुखनेही ३६ धावांची खेळी केली. ७ धावा काढल्यानंतर शेरफेन रदरफोर्डला संदीप शर्माने बाद केले.
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या साई सुदर्शनला १९व्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने झेलबाद केले. साईने १५४.७२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. या डावात त्याने ८ चौकार आणि ३ षटकारही मारले. या षटकात तुषारने रशीदची विकेट घेतली. यशस्वीने विचित्र शॉट खेळणाऱ्या रशीदचा झेल टिपला. रशीदने ४ चेंडूंचा सामना केला आणि १२ धावा केल्या. राहुल तेवतिया २४ धावा करून नाबाद राहिला.
राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. अर्शद खानने यशस्वी जयस्वालला ६ धावांवर तंबूमध्ये पाठवले. पुढच्याच षटकात नितीश राणा झेलबाद झाला. त्याने ३ चेंडूंचा सामना केला आणि १ धाव काढली. यानंतर, कर्णधार संजू आणि रियान पराग यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. कुलवंत खेजरोलियाने परागला जोस बटलरकरवी झेलबाद केले. परागने २६ धावांची खेळी खेळली. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ५ धावा केल्या.
कर्णधार संजू सॅमसन अर्धशतक झळकावू शकला नाही. त्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शुभम दुबेला फक्त १ धाव करता आली. जोफ्रा आर्चरने ४ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हेटमायरने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. तुषार देशपांडेने ३ धावा केल्या.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *