अहमदनगर | १८ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(India news) दै.रयत समाचारने ता. ११ फेब्रुवारी रोजी ‘उड्डाणपुलावरील छत्रपतींच्या चित्रांची विटंबना’ मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. शहरात उड्डाणपूलाच्या पिलरवर लाखो रूपये खर्चून शिवरायांची चित्रे काढलेली असून या चित्रावर चमकोगिरी करणारे व बाजारू जाहिरातदार आपल्या जाहिराती चिकटवून विटंबना करत आहेत. याकडे दै. रयत समाचार व नगर चौफेर यांनी सर्वप्रथम लक्ष वेधले. याबाबत वृत्त प्रसिध्द करून अहमदनगर महानगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली.
(India news) उड्डाणपुलाच्या खालील पिलरवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावर भित्तीपत्रक चिकटवणे एकाला चांगलेच महागात पडले असून महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश बाळकृष्ण कोतकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाल पोलीस स्टेशनमध्ये आर्य करिअर अकॅडमी पोलीस भरती स्पेशल संगमनेर या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
(India news) माळीवाडा बसस्थानक परीसरातील स्टॅण्डमधील एस.टी. बसेस बाहेर पडतात त्या बाजूसमोर पुलाखालील पिलरला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासाचे चित्र रेखाटलेले आहे. त्या चित्रावर आर्य करिअर अकॅडमी पोलीस भरती स्पेशल संगमनेर यांनी पिलरच्या दोन्ही बाजूला जाहिरातीचे पोस्टर लावुन विद्रुपीकरण केलेले आढळून आले. सुनिल खंडेराव कंटगरे यांच्या संस्थेचे हे पोस्टर लावलेले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधि. १९९५ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर