Ad imageAd image

India news | क्रांती एका ‘कपा’ची : जागतिक चहा दिनाची कहाणी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
भाग्यनगरच्या निलोफर चहाचा आस्वाद घेताना चित्राताई वाघ
Highlights
  • World Tea Day

दिनविशेष | २१ मे | प्रतिनिधी

(India news) २१ मे जागतिक चहा दिन म्हणजे जगभरातील करोडो लोकांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग साजरा करण्याचा दिवस. चहा हा केवळ एक पेय नाही, तर अनेक संस्कृतींना जोडणारा पूल. गप्पांचा बहाणा, कष्टकऱ्यांचा ऊर्जास्त्रोत, आणि अनेकदा राजकीय चर्चा व विचारांचा मुक्तमंच.

(India news) चहा उत्पादक देशांतील शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे जीवनमान, आणि चहा उद्योगातील न्याय्य व्यवहार याकडे लक्ष वेधण्यासाठी UN आणि FAO (Food and Agriculture Organization) यांनी २१ मे रोजी International Tea Day म्हणून मान्यता दिली. हा दिवस चहाच्या सर्वांगीण प्रभावाचा विचार करतो जसे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक.

जगातील प्रमुख चहा उत्पादक देश : चीन, भारत, केनिया, श्रीलंका, व्हिएतनाम.
भारतामधील प्रमुख चहा मळे : दार्जिलिंग (पश्चिम बंगाल), आसाम, निलगिरी (तामिळनाडू), कांगडा (हिमाचल प्रदेश)
(India news) भारत आणि चहा : एका क्रांतीची कथा आहे. भारतामध्ये चहा हा इंग्रजांनी आणला असला, तरी तो येथील जनतेच्या जीवनात इतका मिसळला की आज तो ‘भारतीय’च वाटतो. कामगारवर्ग असो वा मध्यमवर्गीय चहा हा रोज सकाळी सुरू होणारा एक संस्कृतीचा भाग झाल आहे.
चहा आणि महिला : भारतातील चहा उद्योगामध्ये ५०% पेक्षा जास्त कामगार महिला आहेत. त्यामुळे चहा हे स्त्रीशक्तीचे देखील प्रतिक आहे.
    चहा ही केवळ पानांची खमंग उकळी नाही, तर लोकशाही, श्रम आणि संवादाची सुरुवात आहे. जागतिक चहा दिन हे केवळ साजरे करण्याचे नव्हे तर चहा तयार करणाऱ्या हातांच्या श्रमाला सलाम करण्याचे औचित्य आहे.
 भारतातील चहा उद्योगाचा इतिहास : भारतात चहा उद्योगाची सुरुवात १९ व्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटीश राजवटीत झाली. मूळतः चीनमधून आलेल्या चहा वनस्पतीच्या लागवडीसाठी ब्रिटिशांनी आसाम आणि दार्जिलिंग या भागांतील हवामान व जमिनीचा उपयोग करून घेतला. १८३५ साली दार्जिलिंगमध्ये आणि त्यानंतर काही वर्षांनी आसाममध्ये चहाच्या लागवडीस सुरुवात झाली. ही लागवड भारतीय शेती व्यवस्थेत औद्योगिक दृष्टिकोन घेऊन येणारी होती. कालांतराने भारत हा जगातील एक प्रमुख चहा उत्पादक देश बनला.
    ब्रिटिशांनी भारतीय चहाला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने या उद्योगात नवनवीन धोरणे राबवून उत्पादन वाढवले. सध्या भारतात दार्जिलिंग, आसाम, नीलगिरी, कांग्रा इत्यादी ठिकाणचा चहा आंतरराष्ट्रीय दर्जाचा समजला जातो.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading