मुंबई | १२ एप्रिल | प्रतिनिधी
(India news) ज्येष्ठ कवी आणि शायर जावेद अख्तर यांना ‘समष्टी पुरस्कार-२०२५’ पुरस्कार ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते मुंबईत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी लोकनाथ गलबलून गेले होते. ते म्हणाले म्हणाले,”सर, मेरी पात्रता नही है, मेरेही हस्ते आपको पुरस्कार दिया जा रहा हैं, मैं आपका बच्चा हुँ” लोकनाथांनी हिंदीतली शक्य तेवढी अनुवादित पुस्तके त्यांना दिली. उद्देश इतकाच होता, जावेदजींना कल्पना यावी की, त्यांना पुरस्कार कुणाच्या हातून दिला जातोय.
(India news) ‘समष्टी कला आणि साहित्य महोत्सवा’त लोकनाथजी आणि जावेद साहब यांची भाषणे गाजली. नामदेव ढसाळ यांची स्मृती जागवणाऱ्या या ‘फेस्टिव्हल’चे आयोजक सन्मित्र वैभव छाया यांनी हात जोडून जावेद साहब यांचे आभार मानले.
(India news) गेल्या काही काळात मराठी साहित्यविश्वाची दोनदा नोंद जावेद अख्तर यांनी घेतली, अशी माहिती मनोज भोयर यांनी दिली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.