कोल्हापूर | १२ जून | प्रतिनिधी
(India news) युपीएससी परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवून आयपीएस पदाला गवसणी घालणारे यमगे (ता. कागल) गावचे सुपुत्र बिरदेव डोणे यांनी नुकतीच खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांची न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे भेट घेतली.
(India news) या भेटीदरम्यान खासदार शाहू महाराजांनी बिरदेव डोणे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी सेवेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “गावखेड्यातील युवक अशा शासकीय सेवेत यश मिळवत आहेत, ही गोष्ट अत्यंत अभिमानाची असून प्रेरणादायी आहे.”
(India news) या प्रसंगी बिरदेव डोणे यांच्यासोबत त्यांची मातोश्री बाळाबाई डोणे, बंधू वासुदेव डोणे, चंद्रकांत पुजारी, तसेच शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी उपस्थित होते.
बिरदेव डोणे यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरत असून, त्यांनी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर ही घवघवीत कामगिरी साध्य केली आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

