मुंबई | २८ मे | गुरूदत्त वाकदेकर
(India news) मराठी लघुपट क्षेत्रात नावाजलेला चित्रभारती लघुपट महोत्सव २०२५ यंदा एका विशेष लघुपटाची अधिकृत निवड झाली आहे. प्रभात चित्र मंडळ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात, ‘वी, द पफकॉर्न्स ऑफ इंडिया’ या लघुपटाने आपल्या स्थानाची खात्री केली आहे.
(India news) या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आदित्य मुंगडे यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “ही संधी संपूर्ण टीमसाठी अभिमानास्पद आहे. चित्रभारतीच्या ज्युरी आणि टीमचे आभार मानतो.” अभिनेत्रीद्वयी वैष्णवी घोडके आणि हरीश बारस्कर, तसेच यश पाटोळे आणि नितीन धांडुके यांचा सहज अभिनय या लघुपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.
(India news) ‘वी, द पफकॉर्न्स ऑफ इंडिया’ लघुपटाची विशेष स्क्रीनिंग ता.३० मे २०२५ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार असून, नवोदित दिग्दर्शकांच्या संधींना नवीन दृष्टी देण्याचा महोत्सवाचा उद्देश आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन!

