(India news) स्वर्गीय दादांच्या अपघातप्रकरणी आज सर्व संबंधित कागदपत्रे व पुरावे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली. अपघाताला जबाबदार असलेल्या व्हिएसआर (VSR) कंपनी तसेच Directorate General of Civil Aviation (DGCA) विरोधात एफआयआर दाखल करणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(India news) आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी एफआयआरसुद्धा घेतली जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे, अशा शब्दांत आमदार पवार यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
(India news) पुढे बोलताना ते म्हणाले, काहीही झाले तरी दोषींना सोडणार नाही. पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढणार आहोत. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या अपघातप्रकरणी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, सीआयडीमार्फत पुढील तपास प्रक्रिया गतीमान होण्याची शक्यता असून, संबंधित यंत्रणांकडून लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.