India news | स्टेट बँक ‘प्लॅटिनम ज्युबिली आशा शिष्यवृत्ती’साठी अर्ज करा; शैक्षणिक वाटचालीला मिळवा हक्काचे बळ

मुंबई | ३०.९ | रयत समाचार

(India news) देशभरातील हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या वाटा सोप्या करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फाऊंडेशनने SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025-26 जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत तब्बल २३,२३० विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

(India news) या उपक्रमासाठी यंदा ₹९० कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला असून शिष्यवृत्तीची रक्कम ₹१५,००० ते थेट ₹२० लाखांपर्यंत असणार आहे.

(India news) शाळेतील विद्यार्थी (इयत्ता ९ वी ते १२ वी), पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी (NIRF टॉप ३०० किंवा NAAC A रेटेड महाविद्यालये), IIT व IIM विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, परदेशात मास्टर्ससाठी जाणारे SC/ST विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
त्यासाठी तुम्ही म्हणजेच अर्जदार भारतीय नागरिक असावा. मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५% गुण किंवा ७.० सीजीपीए आवश्यक. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्तीत जास्त ₹३ लाख, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उत्पन्न ₹६ लाखांपर्यंत असावे तर मुलींसाठी ५०% आरक्षण तसेच SC/ST विद्यार्थ्यांसाठी ५०% आरक्षण आहे.
१५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी sbiashascholarship.co.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार असून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन अर्ज अंतिम करावा.
ही शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना नवे पंख देणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशनने सांगितले.
Share This Article