मुंबई | १३ जुलै | प्रतिनिधी
(India news) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक यु ट्यूब चॅनेलवर ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ (CPI) वर बंदी असल्याचे चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने तीव्र निषेध नोंदवत, संबंधित चॅनेलने माफी मागण्याची मागणी केली आहे.
(India news) राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, फडणवीस यांनी विधानसभेत ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा उल्लेख केला होता. मात्र त्यांच्या वैयक्तिक चॅनेलवर ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ वर बंदी असल्याचे भ्रामक थंबनेल व मथळे वापरून बातमी प्रकाशित करण्यात आली. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून समाजात संभ्रम आणि दहशतीचे वातावरण निर्माण होण्याचा धोका आहे.
(India news) पत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ चा तीव्र विरोध नोंदवला असून हा कायदा लोकशाहीविरोधी असून श्रमिक, महिला, आदिवासी, युवक, विद्यार्थी यांना लक्ष्य करणारा असल्याचे म्हटले आहे. CPI च्या भूमिकेप्रमाणे हा कायदा डाव्या विचारधारेसह विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.
