India news | मूकनायक २०२५ : LGBTIQ मराठी साहित्य संमेलन संपन्न; सम्यकच्या व्हॉलंटियर्सचा उत्साही सहभाग

पुणे | २५.९ | रयत समाचार

(India news) ‘बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशन’ आणि ‘युतक चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, सदाशिव पेठ येथे चौथे ‘मूकनायक २०२५‘ LGBTIQ मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात सम्यकच्या #Unfiltered : Gen-Z Dialogue या उपक्रमाशी जोडलेल्या व्हॉलंटियर्सनी सक्रिय सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलला.

(India news) साहित्य, संस्कृती आणि समता यांच्या सांगोपांग चर्चांना वाव देणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवरील संवाद, काव्यवाचन, अनुभव कथन आणि विचारमंथन यांचा समावेश होता. LGBTIQ समुदायाचे प्रश्न, त्यांच्या अभिव्यक्तीला लागणारा मंच तसेच मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा या संमेलनाचा उद्देश होता.

(India news) आयोजक संस्थांच्या प्रयत्नांसोबतच, सम्यकचे व्हॉलंटियर्स तसेच इतर स्वयंसेवकांच्या योगदानामुळे संमेलनाचे वातावरण अधिक समृद्ध झाले. आयोजक मंडळी, सहभागी लेखक-कलावंत आणि सर्व व्हॉलंटियर्स यांचे अभिनंदन करण्यात आले.

समानतेच्या व साहित्यिक अभिव्यक्तीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ‘मूकनायक २०२५’ खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले.

Share This Article