India news | मनपा कनिष्ठ अभियंता पदभरतीसाठी सुधारित जाहिरात; 31ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

पुणे | रयत समाचार

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार नव्या सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील उमेदवारांना पदभरतीची संधी उपलब्ध झाली. इच्छुक उमेदवारांना ता. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, ही माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली.

राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (SEBC) प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. या निर्णयानंतर पुणे महापालिकेच्या अभियंता पदांसाठीच्या आरक्षण संरचनेत बदल करण्यात आले असून, पदसंख्या वाढवून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तथापि, कोणी उमेदवार नव्याने अर्ज केल्यास पूर्वीचा अर्ज बाद होऊन नवीन अर्जच ग्राह्य धरला जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://www.pmc.gov.in/b/recruitment

या ठिकाणी भेट देऊन सविस्तर माहिती आणि अर्ज सादर करावा, असे आवाहन पुणे मनपाकडून करण्यात आले.

महापालिकेच्या या निर्णयामुळे अधिक मागासवर्गीय आणि समांतर आरक्षण गटातील उमेदवारांसाठी नवीन संधींचे दार खुले झाले आहे.

Share This Article