कोल्हापूर | रयत समाचार
(India news) मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लावलेल्या राजकीय होर्डिंगवर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिमा लावण्यात आल्याचा मुद्दा संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी उचलून धरला आहे.
(India news) राजवैभव यांनी सरन्यायाधीशांना मेलद्वारे पत्र पाठवून या प्रकाराकडे लक्ष वेधले. पत्रात त्यांनी म्हटले की, सर्किट बेंचची स्थापना हा कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक, वकील, जनसंघटना आणि विविध पक्षांच्या दीर्घ संघर्षाचा विजय आहे. मात्र, भाजप या यशाचे संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याहून गंभीर म्हणजे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सरन्यायाधीशांची प्रतिमा होर्डिंगवर लावणे ही असंवैधानिक व अनुचित कृती आहे.
(India news) राजवैभव यांनी स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर सर्व होर्डिंग्ज काढून टाकल्याचे सांगितले. तथापि, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरन्यायाधीशांनी कठोर शब्दांत निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली.
“न्यायव्यवस्था ही लोकांचा विश्वास असलेली सक्षम यंत्रणा आहे. तिच्या स्वायत्ततेला धक्का लावणारी कोणतीही कृती स्वीकारार्ह नाही,” असे राजवैभव यांनी स्पष्ट केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.