India news | भारतीय ज्ञानव्यवस्था : सावित्रीबाई फुले विद्यापीठ इतिहास विभागाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ; विक्री सुरू

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | ३१ ऑगस्ट | रयत समाचार

(India news) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या “भारतीय ज्ञानव्यवस्था” या पुस्तकाची विक्री आता सर्वसामान्य वाचकांसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती इतिहास विभाग प्रमुख श्रध्दा कुंभोजकर यांनी दिली.

 

(India news) अधिक माहिती देताना कुंभोजकर म्हणाल्या ‘भारतीय ज्ञानव्यवस्था’ या पुस्तकात विविध विषयांचा समावेश असून भारतीय पारंपरिक व आधुनिक ज्ञानसंस्था, वैज्ञानिक दृष्टिकोन, संस्कृत भाषा व वैदिक विचारसरणी, बौद्ध-जैन ग्रंथांतील प्राकृत भाषा, स्थापत्य व तंत्रज्ञान, लोकायत (चार्वाक) विचार, मध्यमयुगीन ज्ञाननिर्मिती, वैद्यकशास्त्र (आयुर्वेद-युनानी), खगोलविज्ञान, सूफीवाद, भारतीय फारसी भाषेचा विकास, तसेच ज्ञानाच्या व्याप्ती व महत्त्व अशा विविध अंगांचा समावेश आहे.

 

(India news) या पुस्तकाची किंमत रु. १७५ असून वाचकांना ते थेट इतिहास विभाग ग्रंथालयातून (फोन – ०२०-२५६२१५६१) रोख स्वरूपात किंवा ऑनलाइन पद्धतीने विकत घेता येणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता) पुस्तकाची उपलब्धता असेल.

 

तसेच वाचकांना हे पुस्तक पोस्टाद्वारेही मागवता येणार आहे. यासाठी आपले नाव, फोन नंबर, आवश्यक प्रतींची संख्या आणि पिनकोडसह पूर्ण पोस्टल पत्ता ही माहिती ईमेलवर पाठवावी [email protected].
पुस्तकाची मागणी नोंदवल्यानंतर विभागाकडून उत्तर मेलमध्ये पेमेंट लिंक पाठविण्यात येईल. पोस्टेजसह संपूर्ण किंमत भरल्यानंतर मागविलेल्या प्रती स्पीडपोस्टद्वारे संबंधित पत्त्यावर पाठविण्यात येतील. आता आधार किंवा पॅन कार्ड क्रमांकाची गरज नाही. अनेक वाचकांच्या सूचनेनुसार पुस्तक खरेदीची प्रक्रिया सोपी केली आहे.
इतिहास विभाग प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी संपादन केलेले हे पुस्तक संशोधक, विद्यार्थी आणि वाचकांसाठी भारतीय ज्ञानपरंपरेवर सखोल मार्गदर्शन करणारे आहे.India news

हे ही वाचा : महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ

Womens Power: वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *