नवी दिल्ली |२०.११ | रयत समाचार
(India news) जगप्रसिध्द शास्त्रीय संगीत गुरु पंडित अमरनाथ लिखित ‘हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत का शब्दकोश’ या ग्रंथाचे लोकार्पण व परिचर्चा कार्यक्रम ता. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी लेक्चर रूम- २, इंडिया इंटरनॅशनल सेंटर एनेक्स, मॅक्समूलर मार्ग, नवी दिल्ली- ०३ येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती रसिका लायल- चावला यांनी दिली.
(India news) अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, या शब्दकोशात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील तांत्रिक शब्दावली सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सादर केली आहे. तसेच संगीत क्षेत्रातील नामवंत गुरूंच्या प्रसिद्ध उक्ती, म्हणी आणि त्यांचा अर्थ विश्लेषण हाही या ग्रंथाचा विशेष भाग आहे.
(India news) या पुस्तकाचा इंग्रजी आवृत्ती ‘The Dictionary of Hindustani Classical Music’ या नावाने आधीच प्रसिद्ध असून त्याचा हिंदी अनुवाद संगीतज्ञ राकेश पाठक यांनी केला आहे. हिंदी आवृत्तीची प्रस्तावना प्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांनी लिहिली आहे.
लोकार्पण कार्यक्रमात वक्ते म्हणून शास्त्रीय संगीत गुरु अमरजीत जस, कथक नृत्यांगना निशा महाजन, विदुषी गायिका रेखा भारद्वाज, लेखिका गजरा कोट्टारी आणि अनुवादक संगीतज्ञ राकेश पाठक सहभागी होणार आहेत.
