(India news) महाराष्ट्र राज्यातील संविधान संवाद समितीच्या वतीने १० ते १२ मे २०२५ दरम्यान कोल्हापूर येथे संविधान संवादकांचे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आल्याच माहिती सुभाष वारे यांनी दिली.
(India news) हे शिबीर कशासाठी असेल ही माहिती देताना त्यांनी सांगितले, संविधानातील मूल्ये समजून घेणे. सोप्या भाषेत संविधान संवाद साधण्याची कौशल्य विकसित करणे. सांस्कृतिक अभिव्यक्ती. खेळ, गाणी व, नाटक अशी विविध मॉड्यूल्स समजून घेणे. थेट सर्वसामान्य लोकांशी संवाद साधणारे डेमो आणि संविधान अभ्यासकांशी संवाद होणार आहे.
(India news) शिबीर चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुललाट, ता. शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर येथे होणार असून सहभाग शुल्क ५००/- रूपये आहे. सहभाग नोंदणीसाठी सोबत लिंक दिली आहे. https://forms.gle/kn3oRTaqYQtpucQq6 तर नोंदणी व अधिक माहितीसाठी 8600810043, 9421114879, 9822543485 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले.