National Service Scheme (NSS) ची स्थापना व सुरूवात सीएसआरडी ॲण्ड आयएसडब्ल्यूआर (CSRD & ISWR) येथे झाली
नवी दिल्ली | १७ जानेवारी | प्रतिनिधी
(india news) प्रजासत्ताकदिनाच्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे १२ आणि गोव्यातील दोन असे एकूण १४ स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरथंडीत कसून सराव करीत आहेत.
(india news) राजधानी दिल्ली येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत.
Contents
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे National Service Scheme (NSS) ची स्थापना व सुरूवात अहमदनगर तेथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या (BPHE society) सीएसआरडी ॲण्ड आयएसडब्ल्यूआर (CSRD & ISWR) येथे झाली. आता ही योजना देशभरातील शिक्षण संस्थांमधे लागू करण्यात आली.
हे शिबीर ता. ३१ जानेवारी पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून एनएसएसच्या स्वयंसेवकांसह आलेले डॉ. बी.एन. पुरंदरे (कला), श्रीमती एस.जी. गुप्ता (वाणिज्य) व श्रीमती एस.ए. मिठाईवाला (विज्ञान महाविद्यालय), लोनावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे यांनी दिली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.