पणजी | २१.११ | रयत समाचार
(Iffi) गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) च्या 56व्या पर्वातील ‘सेशन्स @ कला अकादमी (मास्टरक्लास)’ उपक्रमाचा आज प्रेरक आणि ज्ञानसंपन्न असा पहिला दिवस रंगणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला विविध पद्धतीने आकार देणाऱ्या मान्यवरांनी एकाच छताखाली विचारमंथन करत महोत्सवाची बौद्धिक मेजवानी अधिक समृद्ध केली.
दिवसाची सुरुवात प्रख्यात दिग्दर्शक मुजफ्फर अली यांच्या ‘Cinema and Culture: Reflections from Two Eras’ या व्याख्यानाने झाली. सिनेमाच्या बदलत्या भाषा, सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक संदर्भांवर त्यांनी दिलेले चिंतन उपस्थितांना जुने-नवे युग समांतर समजून घेण्याची नवी दृष्टी देणारे ठरले. या सत्राचे सूत्रसंचालन दिग्दर्शक शाद अली यांनी केले.
(Iffi) दुपारच्या सत्रात अभिनेत्री खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम् यांनी ‘The Luminary Icons: Creative Bonds and Fierce Performances’ या विषयावर संवादात्मक कार्यशाळा घेतली जाणार आहे. अभिनयातील सूक्ष्म अभिव्यक्ती, सहकलाकारांतील रसायन, आणि एखाद्या पात्राला जीवंत करणाऱ्या प्रक्रियांवर त्यांनी दिलेल्या खुल्या चर्चा तरुण कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरणार.
(Iffi) दिवसाचा समारोप ‘Reel Green: Sustainability and Storytelling Across Four Cinemas’ या महत्त्वपूर्ण चर्चासत्राने होईल. नीला मधाब पांडा, मिना मोतेकी, गार्थ डेविस, आणि अॅना साउरा यांनी पर्यावरणपूरक चित्रपटनिर्मिती, संसाधनांची जबाबदारी आणि भविष्योन्मुख कथा सांगण्याची गरज यावर विचार मांडणार. या पॅनेलचे संयोजन नमन रामचंद्रन हे करतील.
विचारप्रवर्तक, सर्जनशीलता वाढवणारा आणि चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा असा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडणार आहे.
