समाजसंवाद
२७ सप्टेंबर | गौरव राजेंद्र लष्करे
History आपला महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी फुलून गेला आहे. कोणाच्या तलवारीवर तर कुणाच्या लेखणीवर हा अखंड महाराष्ट्र उभा राहिला. कित्येक वर्षांच्या गुलामगिरीत सोळवटून निघालेलो आपण मोठ्या धाडसाने स्वातंत्र झालो. जगण्याचा अधिकार आपलाला मिळाला पण यासाठी प्रयत्न केले ते हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या लोकांनी. त्यांनी आपले आयुष्य झिजवले. या देशासाठी, स्वतःच्या मरणालाही कधी घाबरले नाही.
या सर्व महापुरूषांची जयंती साजरी करण्यात आनंद वाटतो, ऊर अभिमानाने भरून येते. समाजाला विचार देण्यासाठी व विचारांचे पुजन करण्यासाठी महापुरुषांची जयंती साजरी केली तर उद्या नव्या पिढीला महापुरुष कळतील.
शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार समाजप्रेरक आहेत, माणसाला माणुसपण देणारे आहेत. त्यांच्या विचारावर चालणारा व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी ठरला नाही. यामुळे त्यांचे विचार घेऊनच समाजाने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या गावागावात, घरातच्या उंबरठ्यापर्यंत विचार गेले पाहिजे. यासाठी पुस्तके, किर्तन, व्याख्यानांच्या माध्यमातून महापुरूषांचे विचार समाजाला दिले पाहिजेत.
तुटलेल्या समाजाला आणि विस्कटलेल्या तरुणाईला उभे करण्यासाठी जयंतीला फटाक्यांची तोफ उडवण्यापेक्षा विचारांची तोफ उडवणे आणि जल्लोष साजरा करणे हीच जयंती करण्याची पद्धत वाढविली पाहिजे. कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या जयंती, पुण्यतिथीला गावपातळीवर असलेले तरूण मित्रमंडळी, शहरात नावाजलेले महाविद्यालय, शाळा या सर्व ठिकाणी उत्सव साजरे केले जातात. मोठा खर्च करून आनंद साजरा केला जातो. शहरातून भव्य मिरवणूक काढल्या जातात. २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली. ढोल ताशांचा गजर करत शहरात चौका चौकात तालासुरात गर्जना करण्यात आली. त्यात काहीच चुकीचे नाही. मात्र यासोबतच शाळकरी मुलामुलींना कर्मवीरांचे विचार, त्यांनी समाजासाठी केलेले काम, दलितांच्या मुलांचे आयुष्य शिक्षण घेऊन सुंदर होण्यासाठी, प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी मोठ्या संकटातून कष्ट केले. हा इतिहास जगासमोर अखंड सूर्याप्रमाणे तेवत ठेवणे महत्वाच आहे.
शाळा, विद्यालय, महाविद्यालय, गावांमध्ये व्याख्यान आयोजित केले पाहिजे. पण हे करण्यात आपण सर्वजण कुठे तरी कमी पडत आहोत, यावर विचार करून शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार तुम्ही आम्ही जिवंत ठेवणे गरजेचे आहे.
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.