(History) येथील घाटकोपरमधील सरस्वती विद्यामंदिर, भटवाडी या शाळेत २७ जुलै रोजी महाराणी येसुबाई जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी येसुबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका राणी मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई आणि छत्रपती थोरले शाहूराजे यांच्या तेजस्वी, बाणेदार, पराक्रमी आणि त्यागमयी इतिहासाची माहिती दिली.
(History) हा कार्यक्रम शाळेच्या संचालिका दिपाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. उपक्रमात शिक्षिका मेघना जाधव व युवा इतिहास अभ्यासक हरीश हिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
(History) २७ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी महाराणी येसुबाई, म्हणजेच राजमाता राजाऊ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र यंदा जयंतीचा दिवस रविवारी आल्याने अनेक शाळांना प्रत्यक्ष दिवशी कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही शाळांनी सोमवारी, म्हणजे २८ जुलै रोजी जयंती साजरी केली.
काही खाजगी शाळांना कार्यक्रम घेण्याची इच्छा असूनही रविवारच्या सुट्टीमुळे त्यांना अडचणी आल्या, अशी खंत काही शिक्षकांनी व्यक्त केली. मात्र सरस्वती विद्यामंदिरसारख्या शाळांनी पुढाकार घेत सोमवारी हा कार्यक्रम पार पाडल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाचे कौतुक स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के (महाराणी येसुबाई घराण्याचे वंशज) लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनीही विशेष शब्दांत केले आहे.