समाजसंवाद | १४ जुलै | किशोर मांदळे
(History) अक्कलकोटचा प्रवीण गायकवाडांवरील हल्ला निषेधार्ह तर आहेच पण तो एका शृंखलेचा भाग आहे. मुस्लिमांवरील हल्ले, ख्रिश्चनांवरील हल्ले व ‘संन्यस्त खडग’ नाटकाच्या निमित्ताने बौद्धांवरील हल्ला. ही एक शृंखला. तर मराठा समाजातील प्रबोधकांवरील हल्ल्याची शृंखला ज्ञानेश महाराव, इंद्रजित सावंत व आता प्रवीण गायकवाड अशी आहे. हे प्रबोधक संख्याबहुल मराठा-कुणब्यांना समतावादी प्रवाहाकडे, जो सार रूपाने फुले-शाहू-आंबेडकर असा प्रचलित आहे, तिकडे घेऊन जात आहेत. ही बाब दीर्घकाळ वर्चस्ववादी ब्राह्मणी छावणीला खटकत होती. पण त्यांना सत्तेवर तेवढी निर्णायक बहुमताची ताकद प्राप्त झाली नव्हती. ती होताच त्यांनी मोठी आघाडी समतावादी प्रवाहाच्या विरोधात उघडली आहे.
(History) यात लक्षवेधी बाब अशी की, या भ्याड हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड माध्यमांसमोर आले व त्यांनी आपली भूमिका फुले आंबेडकरी प्रगल्भतेने व ठामपणे मांडली ! त्यांनी हा विचारांचा लढा आहे व आम्ही तो पुढेही चालूच ठेवू. समतेचा विचार व राज्य घटना यांच्यावरील हल्ले परतवून लावू, असे निक्षून सांगितले.
(History) गेली ३० वर्षे आपण सर्व फुले आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांना जवळून पाहात आलो आहोत. २०१८ पासून त्यांनी मराठा-कुणबी समाजातील तरुणाईला आर्थिक साक्षरतेकडे नेण्यासाठी, उद्योजकतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वतंत्रपणे काम चालू ठेवले आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचे तेही एक कारण आहे. ऐहिक जीवनातील समस्यांशी विज्ञाननिष्ठतेने लढण्याची ताकद जर या तरुणाईला मिळाली तर ती धर्मवेडातून मुक्त होईल, ही भिती धार्मिक अजेंड्यातून वर्चस्व राखू इच्छिणाऱ्यांना खटकणारच !
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

