अहमदनगर | २१ जून | प्रतिनिधी
(Health) सध्या धावपळीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. नियमितपणे योगासन, प्राणायाम करणे आरोग्यासाठी हितकारक असून त्यामुळे सदृढ आणि निरोगी जीवनाचा आनंद मिळवता येईल, असे मत योगशिक्षक भानुदास कोतकर यांनी व्यक्त केले.
(Health) आत्मनिर्धार फाउंडेशन आणि आझाद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. योगदिनाचे औचित्य साधून पहाटे पाच ते सात यावेळेत सामूहिक योगासने करण्यासाठी महादेव गवळी यांनी आवाहन केले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

(Health) यावेळी भाऊसाहेब म्हस्के, राजेंद्र खुंटाळे, त्रिदल सैनिक संघाचे मारुती ताकपिरे, रामदास कोतकर, सुदाम म्हस्के, संपत गायकवाड, अजित शिंदे, रंगनाथ सोनवणे, नामदेव लोंढे, यांच्यासह ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते.
योगशिक्षक दत्तात्रय शिरोळे यांनी व्यायाम आणि योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यासोबत त्याचे महत्वही विषद केले. आपले स्वानुभव कथन केले. योगसाधनेत सातत्य राखण्यासाठी येत्या काळात योगवर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
